ncb will destroy 30 thousand kg of drugs: देशातील चार ठिकाणी आज अंमली पदार्थ जाळण्यात येणार आहेत. एनसीबीच्या पथकांकडून ३० हजार किलोग्रॅम इतके अंमली पदार्थ नष्ट केले जाणार आहेत. मादक पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चंदिगढला असतील.

आज ३०,४६८ किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्यात येतील. त्यामुळे एनसीबी आपलं लक्ष्य ओलांडेल. अंमली पदार्थमुक्त भारताच्या वाटचालीत हे महत्त्वाचं पाऊल असेल. केंद्रीय मंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित असतील. त्यांच्यासोबत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि अंमली पदार्थविरोधी यंत्रणांचे अधिकारीदेखील हजर असतील.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.