Koshyari controversial statement about Mumbai | मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी,महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे.हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी,महाराष्ट्राची सभ्यता,संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मानमरातब गेला चुलीत.

हायलाइट्स:
- मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर
- तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत
- मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही
अनिल शिदोरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर फेसबुकवरून अत्यंत संयत भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमधून अनिल शिदोरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्र हे प्रगत का आहेत, याचे कारण सांगितले आहे. प्रगत दृष्टी असलेला समाज, शिक्षित आणि कुशल मनुष्यबळ, प्रबोधनाची मोठी परंपरा आणि व्यापार तसेच उद्योगस्नेही राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण असल्याशिवाय भांडवल येऊन संपत्तीची सतत निर्मिती होत रहात नाही. महाराष्ट्राच्या मा. राज्यपालांनी महाराष्ट्राचा हा इतिहास जाणला पाहिजे. जय महाराष्ट्र !, असे अनिल शिदोरे यांनी म्हटले आहे.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला मनसेचे नेते गजानन काळे यांनी राज्यपालांविरोधात कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत गजानन काळे यांनी योग्य तो इशारा दिला आहे. मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी,महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे.हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी,महाराष्ट्राची सभ्यता,संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मानमरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका, असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
राज्यपाल कोश्यारींनी नेमकं काय म्हटलं?
“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network