रत्नागिरी: शहरातील आरडीसीसी बँकेच्या नावाचा गैरवापर करून अज्ञात इसमाने बँकेची दहा लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. बँकेचे उपव्यवस्थापक योगेश गजानन मोरे यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
तक्रारीनुसार, आरडीसीसी बँकेचे आयडीबीआय बँकेत खाते आहे. या खात्याच्या माध्यमातून काही व्यवहार करायचे असल्यास, आरटीजीएस किंवा एनईएफटी करायची असल्यास ऑनलाइन फाइल आयडीबीआय बँकेत पाठवते. मात्र, ४ मे रोजी कोणतीही फाइल आयडीबीआय बँकेत पाठवण्यात आलेली नव्हती. असे नसताना कोणीतरी अज्ञात इसमाने आरडीसीसी बँकेच्या खात्यावरून बनावट युनिक आयडी साइन वापरून दहा लाखांचा व्यवहार केला. त्यामुळं बँकेची दहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines