मुंबईसह देशाच्या विकासात मराठी माणसाचं मोठं योगदान आहे. उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाचं योगदान उल्लेखनीय आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता आपल्या निवासस्थान मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. “राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषज आज दुपारी मातोश्री येथे १ वाजता”, असं ट्वीट राऊतांनी केलं आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो, असे राज्यपालांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. आता राज्यपालांच्या या स्पष्टीकरणानंतर तरी हा वाद शांत होणार का, हे पाहावे लागेल.