Uddhav Thackeray press conference : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

हायलाइट्स:
- कोश्यारींनी राज्यपाल पदाचा आणि खुर्चीचा मान ठेवलेला नाही
- राज्यपाल वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात
- कोश्यारींना कोल्हापूर जोडा दाखवण्याची गरज
- कोश्यारींनी राज्यपाल पदाचा आणि खुर्चीचा मान ठेवलेला नाही
- राज्यपाल वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात, आता त्यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान
- कोश्यारींना कोल्हापूर जोडा दाखवण्याची गरज ,महाराष्ट्राचा अपमान कराल तर कोल्हापूरी जोडा दाखवू
- रक्त सांडून मुंबई मिळवली आहे, कोश्यारींनी आंदणात दिली नाही
- राज्यापालांकडून जाणून बुजून महाराष्ट्राचा अपमान
- कोश्यारींनी हिंदूमध्ये फूड पाडण्याचं नीच काम केलं आहे
- राज्यपाल कोश्यारींनी महाराष्ट्राची माफी मागावी
- कोश्यारींच्या वक्तव्यावर अमराठी माणसांना देखील चीड
- कोश्यारी नावाचं पार्सल परत न्या
- राज्यपालांच्या ओठावरील वक्तव्य कोणाच्या पोटातलं? उद्धव ठाकरेंचा सवाल
- रावणाची कितीही मुंडकी उडवली, तरी तो मरत नाही
- दिल्लीत बसूनही काही जणांचा जीव मुंबईत, याचं कारण पैसा
- मुंबईचं वैभव गिळायचंय हे उघड सांगितल्याबद्दल आभार
- मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ध्रुवीकरण करण्यासाठी वक्तव्य
दरम्यान, महाराष्ट्राला मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही. १०५ जणांनी हौतात्म्य पत्करलं आहे. रक्त सांडून मुंबई मिळवलेली आहे. कोश्यारी यांनी त्यांच्या विधानातून मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांना कोण भाषणं लिहून देतं याची कल्पना नाही. मुंबईतच लिहिली जातात की दिल्लीतून पाठवली जातात, हा संशोधनाचा विषय असल्याचं देखील ठाकरे म्हणाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network