राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले?
मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. नोकरी, व्यवसाय तसेच आपलं नाव मोठ करण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि आपली स्वप्न पुर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र, राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र, मुबंईची ती ओळखही उरणार नाहीस असंही कोश्यारी यावेळी म्हणाले.
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी देखील सेफ गेम खेळला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, राज्यापालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत. महाराष्ट्रात मराठी माणसाचं योगदान उल्लेखनीय आहे. राज्यापालांच्याही मनात मराठी माणासाबद्दल आदर आहे, असं फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मुंबईसह देशाच्या विकासात मराठी माणसाचं मोठं योगदान आहे. उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाचं योगदान उल्लेखनीय आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.