बदलापूर : बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा (Swine Flu in Badlapur) पहिला रुग्ण आढळला आहे. एका वयोवृद्ध डॉक्टरांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. यामुळे बदलापूर महापालिका सतर्क झाली असून पालिकेची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान, मलंगगड येथील एका गावात सुद्धा एकाला स्वाइन फ्लूची लागण झालेली आहे. तर, डोंबिवलीत देखील फ्लूचे प्रमाण वाढले आहे. (the first case of swine flu was found in badlapur)

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता जगभरात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचा प्रसार वाढू लागलाय. त्यातच ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळलाय. बदलापुरातील एका वयोवृद्ध डॉक्टरला स्वाइन फ्लूची लागण झाली असून परदेशातून आलेल्या एका नातेवाईकमुळे ही लागण झाल्याचे बदलापूर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी माहिती देताना सांगितले आहे.

स्वाइन फ्लूने वाढवला ताप; मुंबईजवळच्या शहरांमधील वाढती रुग्णसंख्या धडकी भरवणारी
स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्यानंतर संबंधित रुग्णाच्या परिसरात आरोग्य विभागाने ट्रेसिंग सुरू केले आहे. बदलापूर शहर हे मुंबईजवळील सॅटेलाइट शहारांपैकी एक समजले जाते. कारण, या शहरात मुंबई आणि नवी मुंबईत कामाला जाणारे चाकरमानी सर्वाधिक संख्येने वास्तव्याला आहेत. कोरोना काळात बदलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ओबीसी आरक्षण जाहीर, या एका गोष्टीमुळे अनेक चिंतेत
ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने जुलै महिन्याच शिरकाव केला. तेव्हापासूनच ठाणेकरांची चिंता वाढली आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये तर ठाणे महापालिका क्षेत्रात ३२ नवे रुग्ण आढळले होते. तर, गुरुवारी २५ रुग्ण आढळले होते.

ठाणे शहरात स्वाइन फ्लूने आतापर्यंत एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात दिवसाला साधारण ८ ते १० रुग्ण आढळून येत आहेत. तर आजमितीला २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीत एकूण १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, नवी मुंबई शहरातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. नवी मुंबईत एकूण ९ जणांवर उपचार सुरू आहेत. मिरा-भाईंदर शहरातही एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.येथे एकूण दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठाण्यातील शिंदे गटाला फुटीची धास्ती; आनंद दिघेंच्या निवासस्थानी पाहा काय चाललंय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here