सांगली : सांगलीच्या संकेत सरगरने कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. बर्मिंघहम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संकेतने भारताला पहिलं पदक जिंकून दिलं आहे. ५५ किलो वजनी गटात संकेत महादेव सारगरने रौप्य पदक जिंकलं आहे. त्याच्या यशाने कुटुंबाला आभाळ ठेंगणं झालं आहे तर सांगलीसह महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलली आहे. पण त्याच्या यशाला गरिबीची, घरच्या अठरा विश्व दारिद्र्याची झालर आहे. घरची गरिबीची परिस्थिती असल्याने त्याला आपल्या वडिलांच्या पानाच्या टपरीवर बसावं लागत असे. पण त्याने आपल्या गरिबीला कधी कारण बनलं नाही. मध्यमवर्गीय परिस्थितीला कधी आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिलं नाही. पानाच्या टपरीवर बसून त्याने सुवर्णपदकाचं स्वप्न पाहिलं. त्यादृष्टीने जिद्दीने कष्ट केले. आज त्याचं सुवर्णपदकाचं स्वप्न थोडक्यात हुकलं असलं तरी भारतासाठी पहिलं रौप्यपदक जिंकवून त्याने देशाची मान अभिमानाने ताठ केली आहे.

इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी सांगलीच्या संकेत सरगरने भारताला पहिलं पदक जिंकून दिलं आहे. ५५ किलो वजनी गटात संकेत महादेव सारगरने रौप्य पदक जिंकले. संकेत सरगरने दोन फेऱ्यांमध्ये 6 प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण 228 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. मूळचा सांगलीचा असलेल्या संकेतने यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलीच, पण चमकदार कामगिरी करून लोकांची त्याने मनंही जिंकली. त्याने पहिल्या फेरीत म्हणजे स्नॅचमध्ये सर्वोत्तम 113 वजन उचलले. यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत म्हणजेच क्लीन अँड जर्कमध्ये १३५ वजन उचलून पदक जिंकले. गेल्या वर्षी चॅम्पियनशिपमध्ये देखील त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

आनंद दिघेंसोबत घडलेल्या घटना मी पाहिल्यात, जास्तीचं बोलाल तर मी माझं तोंड उघडेल : एकनाथ शिंदे
घरची बेताची परिस्थिती असल्याने संकेतचे वडील पानाची टपरी चालवायचे, त्याचबरोबर त्यांचं नाश्ता सेंटरही होतं. संकेत वडिलांना मदत म्हणून दुकानावर बसायचा. वडिलांना शक्य तितकी मदत करायचा. होतकरु संकेतला पहिल्या पासूनच खेळाची आवड होती. वेटफिल्टिंगमध्ये त्याने योग्य ते प्रशिक्षण घेतलं. घरच्यांनी देखील संकेतला त्याच्या प्रयत्नांत साथ दिली. त्याला पाहिजे ती मदत केली. आवश्यक तो सपोर्ट केला. त्याच बळावर त्याने आपली घौडदौड सुरु ठेवली. अखेर आज त्याने भारताला कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिलं रौप्यपदक जिंकवून दिलं.

लहानपणापासूनच संकेत व्यायामशाळेत सराव करायचा. पहिले काही दिवस वेटलिफ्टर व्हायचं, हे त्याच्या मनातही नव्हतं. मात्र दररोजच्या सरावाने त्याला वेटलिफ्टिंगची सवय झाली. मग तो आपल्या करिअरमध्ये सिरिअस होऊन लक्ष देऊन सराव करु लागला. अपार कष्टामुळे अवघ्या २१ व्या वर्षी अपेक्षित यश मिळालं. आज मिळावेलं रौप्यपदक त्याने देशाच्या जवानांचरणी अर्पण केलंय. संपूर्ण भारतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेतचं अभिनंदन केलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here