विशेष अधिवेशन बोलावून राज्यपालांना हटवा
आसावा यांनी सांगितले की, “राज्यपाल कोश्यारी यांनी मारवाडी, गुजराथी, राजस्थानी लोकांच्या बाबतीत वादग्रस्त व निंदनीय विधान केले. ते सर्वत्र प्रसार माध्यमे व सोशल मिडीयातुन फिरत आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या या राज्यपालांनी असे बेजबाबदार वक्तव्य सहजपणे होऊ शकत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध जाती धर्मातील लोकांमध्ये गैरसमज व द्वेष पसरून सामाजिक व सौहार्दपूर्ण शांतिपूर्ण वातावरण बिघडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे”.
“खरं तर राज्यपालांवर या वक्तव्याबद्दल फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे, परंतु राज्य घटनेतील कलम ३६१ नुसार राज्यपालांना असलेल्या विशेषाधिकारामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई शक्य नाही. त्यामुळे तातडीने विशेष अधिवेशन बोलावून त्यात कोश्यारी यांना राज्यातून परत बोलविण्याचा ठराव करावा. यापुढे त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी जबाबदार धरण्यात यावे”, अशी मागणीही आसावा यांनी केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही”, असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह सर्वच विरोधकांनी राज्यपालांवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने देखील राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे. राज्यापालांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहेत.