बर्मिंगघम: कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२ मध्ये भारतानं चौथ्या पदकाची कमाई केली आहे. बिंदियाराणी देवीनं वेटलिफ्टिंगच्या ५५ किलो गटात रौप्य पदकाची कमाई केली. बिंदियाराणीनं स्नॅचमध्ये ८६, तर क्लीन अँड जर्कमध्ये ११६ चा स्कोअर केला. एकूण २०२ किलोचा स्कोअर करत तिनं रौप्य पदक पटकावलं.

वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर बिंदियाराणीनं आनंद व्यक्त केला. मी पहिल्यांदा कॉमनवेल्थमध्ये खेळले आणि रौप्य पदकावलं. आज मी आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र माझ्या हातून सुवर्ण निसटलं. त्यामुळे मी पोडियमच्या मध्यभागी नव्हते. पुढल्या वेळी अधिक चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी भावना बिंदियाराणीनं व्यक्त केली.
CWG 2022 : मीराबाई चानूने इतिहास रचला, कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेतील पहिलं सुवर्णपदक, देशभरात जल्लोष
कॉमनवेल्थमध्ये भारताला आतापर्यंत चार पदकं मिळाली आहेत. ही चारही पदकं वेटलिफ्टर्सनी पटकावली आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणाऱ्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. बर्मिंगघम कॉमनवेल्थमधलं हे भारताचं पहिलं सुवर्ण पदक ठरलं. संकेत सरगर आणि गुरुराजा पुजारी यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं.
CWG 2022: सातासमुद्रापार मराठीचा डंका, सांगलीच्या पोराची रुपेरी कामगिरी, पंतप्रधानही भारावले…
बिंदियाराणीचा भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षण घेत आहे. करोना काळात प्राधिकरण बंद होतं. मात्र बिंदियाराणीचा सराव थांबला नाही. वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या प्रशिक्षक राहिलेल्या अनिता चानू यांच्या मार्गदर्शनाखाली बिंदियाराणीनं सराव सुरुच ठेवला. बिंदियाराणीनं मलेशियाच्या पेनांगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक युवा चॅम्पियनशिपच्या माध्यमातून २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं. त्यात ती १० व्या स्थानी राहिली. २३ वर्षांच्या बिंदियाराणीनं २०१९ मध्ये साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं. २०१९ मध्ये तिनं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप खिताब जिंकला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here