हे वाचा-राज्यपाल असं का म्हणाले हे मला… अभिनेते सचिन पिळगावकर स्पष्टच बोलले
अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनेच तिच्या गाजलेल्या ‘फुलपाखरू’ मालिकेत वैदेहीची भूमिका साकारली होती. याच भूमिकेतून ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. दरम्यान प्रेक्षकांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की दीपू आणि वैदेही यांचं मंगळसूत्र सारखच आहे. दोन्ही मालिकांमध्ये हृताने परिधान केलेली मंगळसूत्र अतिशय नाजूक आणि जवळपास सारखी आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या एका दीपू-इंद्राच्या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत ही बाब निदर्शनास आणली.

‘वैदेही’चे जुने फोटो पाहिल्यास या भूमिकेसाठी हृताने सोन्याचं पेंडंट असणारं मंगळसूत्र परिधान केलं होतं. हे सोन्याचं पेंडंट नाजूक पानांचं होतं. तर दीपूचंही पेंडंट नाजूक पानांचंच आहे, मात्र ते हिऱ्याचं आहे. त्यामुळे चाहत्यांना या मंगळसूत्रांचा पॅटर्न काहीसा सारखा वाटला आहे. फुलपाखरू आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत हृताने ‘वैदेही’ आणि ‘दीपिका’ या भूमिकांसाठी परिधान केलेल्या मंगळसूत्रांची सध्या चर्चा होतं आहे.
असा होता वैदेहीचा लूक-
हे वाचा-पतीच्या निधनानंतर कोलमडून गेलीये अभिनेत्री, म्हणाली- आयुष्य आता पूर्वीसारखं नाही
नायिकांची मंगळसूत्र ठरतात चर्चेचा विषय
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने काही वर्षांपूर्वी ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेत ‘जान्हवी’ ही भूमिका साकारली होती. या मालिकेचं कथानक आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले होते. या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय झालेली गोष्ट म्हणजे जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान हिने या मालिकेत परिधान केलेले मंगळसूत्र. त्या तीन पदरी मंगळसूत्राची विशेष चर्चा झाली होती. त्यानंतर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत’नेहा चौधरी’ या भूमिकेसाठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने परिधान केलेल्या मंगळसूत्राचीही चर्चा झाली.