मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक सकाळी ७ च्या सुमारास संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं. गेल्या ४ तासांपासून राऊत यांची चौकशी सुरू आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी राऊतांवर तोफ डागली आहे.

राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पद्धतशीरपणे संपवण्याचे प्रयत्न सुरू असताना राऊत गप्प होते. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला ५७ टक्के निधी मिळत होता. मात्र त्यावेळी राऊत शांत होते. शिवसेना संपली तरी चालेल. पण राष्ट्रवादीवर बोलायचं नाही अशी त्यांची भूमिका होती. राऊतांनी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीसाठी अधिक काम केलं, अशी घणाघाती टीका कदम यांनी केला.
राऊतांच्या घरावर आजच छापा का पडला?; राष्ट्रवादीच्या आमदारानं वेगळाच योगायोग सांगितला
जालन्याचे शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. माझ्यावर आणि कुटुंबावर दबाव असल्यानं शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण ही बाब उद्धव ठाकरेंना सांगितल्याचंही ते म्हणाले. यावरही कदम यांनी भाष्य केलं. दोन दिवसांपूर्वी मला खोतकरांचा फोन आला होता. मी मतदारसंघात जातोय. तिथे जाऊन लोकांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेईन, असं त्यावेळी त्यांनी सांगितल्याची माहिती कदम यांनी दिली.
संजय राऊत तुमच्याकडे आले तर पवित्र होतील का? शिंदे गटाचे संजय हसले अन् म्हणाले…
दबाव असल्यानं शिंदे गटात जात असल्याचं खोतकरांनी जाहीरपणे सांगितलं. त्यावर कदमांना प्रश्न विचारण्यात आला. खोतकर इतका घाबरट कधीपासून झाला, असा प्रतिप्रश्न कदम यांनी केला. त्यांनी पैसे खाल्ले आहेत का, पैसे खाल्ले म्हणून ते घाबरत आहेत का, असे प्रश्न मी खोतकरांना भेटल्यावर विचारणार असल्याचं कदम म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here