शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांना भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी धक्का दिला आहे. खोतकर यांनी कालच शिंदे गटात प्रवेश केला. आपल्यावर दबाव आहे. संकटं येतात त्यावेळी माणूस सेफ होण्याचा प्रयत्न करतो, असं सूचक विधान त्यांनी केलं.

 

danve and shinde
रावसाहेब दानवे आणि एकनाथ शिंदे
जालना: शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांना भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी धक्का दिला आहे. खोतकर यांनी कालच शिंदे गटात प्रवेश केला. आपल्यावर दबाव आहे. संकटं येतात त्यावेळी माणूस सेफ होण्याचा प्रयत्न करतो, असं सूचक विधान त्यांनी केलं. खोतकर यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. आता खुद्द खोतकर यांनी दबाव असल्याचं सांगितलं आहे.

अर्जुन खोतकर जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं बोललं जातं. आता खोतकर शिंदे गटात आले आहेत. राज्यात शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली सरकार आहे. सरकारला भाजपचा पाठिंबा आहे. त्यामुळे खोतकरांना लोकसभा निवडणूक लढवायची असल्यास भाजपला मतदारसंघ सोडावा लागेल. रावसाहेब दानवे लोकसभेत जालन्याचं प्रतिनिधीत्व करतात.
अर्जुन खोतकर इतका घाबरट कधीपासून झाला? रामदास कदमांचा आक्रमक पवित्रा
पाय ठेऊ देणार नाही- दानवे
जालना लोकसभा मतदारसंघातून नऊवेळा भाजपचा विजय झाला. पाचवेळा रावसाहेब दानवे, प्रत्येकी दोनवेळा उत्तमसिंह पवार आणि पुंडलिकराव दानवे इथून विजयी झालेत. आम्ही ही जमीन वखरली, नांगरली, तिथे पेरणी केली. आता तिथून सगळा माल निघत असताना आम्ही तिथे कोणाला पाय ठेऊ देणार नाही. हा मतदारसंघ भाजपचा आहे. ती रावसाहेब दानवेंच्या बापाची जहागीर नाही. इथे हरिभाऊ उभे राहतील किंवा दुसरं कोणीतरी निवडणूक लढवेल. पण भाजप आपला मतदारसंघ सोडणार नाही. आम्ही ४५ वर्षे हा मतदारसंघ ताब्यात ठेवला नाही. तो दुसऱ्या पक्षाला देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी स्पष्ट भूमिका दानवेंनी मांडली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here