police bravery award | या कारवाईत वाशिम येथील जवान ज्ञानदेव देवराव महाले हे सुद्धा सहभागी होते. या चकमकीत ठार झालेले दहशतवादी ‘अल बदर’ या जहाल गटाचे होते. या धाडसी कारवाईबद्दल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ज्ञानदेव महाले यांना राष्ट्रपती वीरता पदक जाहीर केले होते. त्यानुसार नवी दिल्ली येथील वसंत शौर्य ऑफिसर इन्स्टिट्यूट येथे केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या डायरेक्टर जनरल यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात ज्ञानदेव महाले यांना वीरता पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

हायलाइट्स:
- वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे
- अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांना वीरता पदकाने नुकतेच सन्मानित करण्यात आले
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाची अठरावी बटालियन आहे. कुलगामच्या पोलीस अधीक्षकांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला एक ठिकाणी काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर या बटालियनच्या जवानांनी तिथला परिसर घेरून दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. या कारवाईत वाशिम येथील जवान ज्ञानदेव देवराव महाले हे सुद्धा सहभागी होते. या चकमकीत ठार झालेले दहशतवादी ‘अल बदर’ या जहाल गटाचे होते.
या धाडसी कारवाईबद्दल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ज्ञानदेव महाले यांना राष्ट्रपती वीरता पदक जाहीर केले होते. त्यानुसार नवी दिल्ली येथील वसंत शौर्य ऑफिसर इन्स्टिट्यूट येथे केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या डायरेक्टर जनरल यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात ज्ञानदेव महाले यांना वीरता पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. कळंबा महाली सारख्या छोट्याशा गावातील भूमीपुत्राने मिळवलेलं हे शौर्यपदक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network