Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 31, 2022, 12:57 PM
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान आणि करिना कपूर खान यांचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हे दोघंजण या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यग्र आहेत.

करिनाला आलिया भट्ट हिच्या प्रेग्नंसीवरुन प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न ऐकताच करिना भडकल्याचं पाहायला मिळालं. आलियाला काही प्रेग्नंसी टीप्स देणार का? असा प्रश्न करिनाला विचारण्यात आला होता. पण आलियाबद्दल प्रश्न विचारलेलं करिनाला काही आवडलं नाही.
काय म्हणाली करिना?
मला हे कळत नाही की, मी दुसऱ्यांच्या गरोदरपणावर का बोलावं, का प्रतिक्रिया द्यावी. आणि अशा काळात कुणी कुणाला काही सांगण्याच्या फंद्यात पडू नये. मलाही कोण काही टीप्स देत असल्यास आवडायचं नाही’, असं करिना म्हणाली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.