संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांच्यावर सातत्यानं आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यावर आरोप केले होते. तेच अस्लम शेख देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
अस्लम शेख मोहित कंबोज
हायलाइट्स:
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी
अस्लम शेख देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोहित कंबोज सोबत असल्यानं चर्चांना उधाण
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक खळबळ उडवून देणारी बातमी समोरी आली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अस्लम शेख आणि मोहित कंबोज या दोघांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर आरोप केले होते. अस्लम शेख यांनी मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी मोहित कंबोज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता थेट अस्लम शेख आणि मोहित कंबोज यांनी एकत्रित देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारण कुठल्या वळणावर जाणार हे पाहावं लागणार आहे. सेनेतील आमदार फुटल्यानंतर आता काँग्रेसमध्ये काय घडणार असा प्रश्न या भेटीनंतर उपस्थित होत आहे.