Vikhe Patil criticizes Sanjay Raut, आता दूध का दूध, पानी का पानी होईल; विखे पाटील यांचे संजय राऊतांवर जोरदार टीकास्त्र – bjp leader radhakrishna vikhe patil criticizes shiv sena leader sanjay raut after action taken by ed
शिर्डी: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्राचाळीचा विकास करण्याच्या नावाखाली इथल्या मराठी माणसाशी आणि महाराष्ट्राशी केलेल्या बेईमानीची किंमत संजय राऊत यांना चुकवावीच लागेल, असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊत यांना लगावला आहे. (bjp leader radhakrishna vikhe patil criticizes shiv sena leader sanjay raut)
संजय राऊत यांना चौकशीनंतर ईडी कार्यालयात आणल्यानंतर शिर्डी येथे माध्यमांशी बोलतांना विखे म्हणाले की, पत्राचाळीच्या घोटाळ्याबाबत जी माहिती माध्यमातून पुढे येत होती, तेव्हाच या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले होते. परंतु, मी डरपोक नाही अशा वल्गना करणारे संजय राऊत ईडीने चौकशीकरिता बोलावूनही न जाता स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. आता खऱ्या अर्थाने दूध का दूध और पानी का पानी होईल, अशी टिप्पणी त्यांनी केली. ज्यांचं मोठेपण म्हणून विधान केलं ते ही राज्यपालांवर नाराज, मारवाडी-गुजराथी समाजाची मोठी मागणी पत्राचाळीच्या विकास करण्याच्या नावाखाली मराठी माणसाची फसवणूक करून संजय राऊत यांनी महाराष्ट्राशीच बेईमानी केली असल्याचा थेट आरोप करून विखे म्हणाले की झुकेगा नही म्हणणारे संजय राऊत यांच्यावर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेण्याची आलेली वेळ ही निष्ठावान सैनिकांशी केलेली बेईमानी म्हणावी लागेल. विचारांशी प्रतारणा करून शिवसेना ज्यांच्या दावणीला बांधायला तुम्ही निघाला होता त्यातून खरा शिवसैनिक आता वाचला आहे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही त्यामुळे भावनिक विधान करून जनतेची दिशाभूल करू नका. इमानदारीची मुक्ताफळे आता जेलमध्ये जाऊन उधळीत बसा. शेरो शयारीला देखील आता पुष्कळ वेळ मिळेल त्याचाही आनंद जेलमध्ये घ्यावा, असा टोला विखे पाटलांनी लगावला आहे.
आणखी एका जिल्ह्यात शिवसेनेत फूट, नगरसेवक-पदाधिकारी शिंदे गटात दाखल कायद्यापुढे कोणी मोठे नाही. या राज्यात मागचे अडीच वर्ष ज्या पध्दतीने सतेचा दुरुपयोग करून सामान्य माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, ते आज ईडीने केलेल्या कारवाई वर टिका करताना का विसरतात, असा प्रश् त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसला सतेत असतानाही किंमत नव्हती. त्यामुळे आज त्यांनी केलेल्या वक्तव्याला आपण फारसे महत्व देत नसल्याचेही विखे यांनी शेवटी सांगितले.