मुंबई: शिवसेनेचे खासदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय संजय राऊत यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अटक झाली आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) राऊतांना अटक केली. काल सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांच्या भांडूप येथील बंगल्यावर छापा टाकला. या कारवाईत ईडीला ११ लाख ५० हजार रुपये सापडले. या प्रकरणात ईडीनं २७ जुलै समन्स जारी केलं होतं. मात्र संसदेच्या अधिवेशनाचं कारण देत राऊत ईडीच्या कार्यालयात गैरहजर राहिले. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात राऊत यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी वर्षादेखील आरोपी आहेत.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना राऊत यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली होती. आपल्याकडे १ लाख ५५ हजार ७७२ रुपये रोकड असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं. बँक खात्यात १ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रुपये असल्याचं राऊतांनी सांगितलं होतं.
राऊतांच्या घरी सापडलेल्या दहा लाखांच्या कॅशवर ‘एकनाथ शिंदें’चं नाव, बंधू सुनील राऊतांचा आरोप
राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्याकडे ७२९.३० ग्रॅम सोनं आहे. दागिन्यांची किंमत ३९ लाख ५९ हजार ५०० रुपयांच्या घरात जाते. राऊतांच्या पत्नीकडे १८२० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आहेत. त्यांची किंमत ३० हजार रुपयांच्या आसपास आहे.

राऊतांच्या नावे बँकेत ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात राऊतांचं उत्पन्न २७ लाख ९९ हजार १६९ रुपये होतं. तर त्यांच्या पत्नीची कमाई २१ लाख ५८ हजार ७९० रुपये होती.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर ‘सामना’चा पहिला अग्रलेख; राज्यपालांसह भाजपवर घणाघाती हल्ला
दादर, अलिबाग, पालघर अशा भागांमध्ये राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे फ्लॅट आणि प्लॉट असल्याचं समजतं. काल ईडीनं राऊतांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपये जप्त केले. त्याआधी ए्प्रिलमध्ये ईडीनं राऊत यांची ११.५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. राऊत यांचा दादरमधील फ्लॅट ईडीनं सील केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here