ED seized cash from Sanjay Raut house | संजय राऊत यांनी मुद्दाम या पैशांवर एकनाथ शिंदे यांचे नाव लिहले असेल तर ते कोणालाही कळणार नाही. कारण संजय राऊत अत्यंत हुशार आणि बुद्धिमान आहेत. ते काहीही करू शकतात. पण या पैशांशी एकनाथ शिंदे यांचा कोणताही संबंध नाही, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. आम्ही गुवाहाटीमध्ये असतानाही आमदारांना पैसे देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

हायलाइट्स:
- १० लाखांच्या रक्कमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहण्यात आले होते
- संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काही करायचे असेल
- संजय राऊत यांनी हे पैसे राखीव ठेवले असतील
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या सगळ्यामागे संजय राऊत यांनी वेगळी चाल असू शकते, असा संशय व्यक्त केला. संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या १० लाखांच्या रक्कमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहण्यात आले होते. कदाचित संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काही करायचे असेल, त्यासाठी त्यांना अयोध्येला जायचे असेल. त्यासाठी संजय राऊत यांनी हे पैसे राखीव ठेवले असतील. या पैशांचा स्रोत दाखवावा लागेल. तो त्यांनी दाखवावा, राऊत यांच्याकडे त्याबाबत माहिती असेल, असे केसरकर यांनी म्हटले.
तसेच संजय राऊत यांनी हे पैसे जाणीवपूर्वक ठेवले असावेत, अशी शक्यताही दीपक केसरकर यांनी बोलून दाखवली. संजय राऊत यांनी मुद्दाम या पैशांवर एकनाथ शिंदे यांचे नाव लिहले असेल तर ते कोणालाही कळणार नाही. कारण संजय राऊत अत्यंत हुशार आणि बुद्धिमान आहेत. ते काहीही करू शकतात. पण या पैशांशी एकनाथ शिंदे यांचा कोणताही संबंध नाही, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. आम्ही गुवाहाटीमध्ये असतानाही आमदारांना पैसे देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. परंतु, तेव्हाही आम्ही आमच्या हॉटेलच्या रूम आणि घरांची झडती घ्या, असे म्हटले होते, असेही केसरकर यांनी सांगितले.
त्या पैशांबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले?
संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या पैशांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या रक्कमेवर माझे नाव असेल तर ते संजय राऊत यांनाच विचारा. असल्या फाल्तू गोष्टींना मी घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला?, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network