जोधपूर: राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका तरुणाला पोटदुखीचा त्रास झाला. त्याच्या पोटाचा एक्सरे करण्यात आला. एक्सरे पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. तरुणाच्या पोटात तब्बल ६३ नाणी होती. जोधपूरमधील मथुरादास माथूर रुग्णालयाच्या सुपर स्पेशॅलिटी विंग गॅस्ट्रॉलॉजी विभागाच्या टीमनं शस्त्रक्रिया करून नाणी बाहेर काढली.

चौपासनी हाऊसिंग बोर्ड परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाच्या पोटात दुखू लागलं. त्याचे कुटुंबीय त्याला घेऊन संध्याकाळी ४ वाजता मथुरादास माथूर रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी तरुणाला रुग्णालयात दाखल करून घेतलं. एक्सरे पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. रुग्णाच्या पोटात बरीच नाणी असल्याचं डॉक्टरांना दिसलं.
विमानानं पेट घेतला, मृत्यू समोर दिसू लागला; शेवटच्या क्षणी पायलटनी ३ हजार जणांचा जीव वाचवला
डॉक्टरांनी रुग्णाकडे नाण्यांबद्दल विचारणा केली. आपण नाणी गिळल्याचं रुग्णानं डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून नाणी बाहेर काढली. तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मिग-२१ च्या अपघातात पायलटचा मृत्यू; शहीदाच्या कुटुंबासोबत विमानात घडला संतापजनक प्रकार
विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र भार्गव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. सुनील दधीच यांच्या नेतृत्त्वाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. साबिर हुसेन, डॉ. सेवाराम, डॉ. राजेंद्र भाटी, डॉ. विवेक, डॉ. अभिषेक आणि डॉ. बॉबी यांनी गॅस्ट्रोस्कॉपीच्या माध्यमातून आणि विशेष उपकरणांच्या सहायानं ६३ नाणी काढली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची स्थिती उत्तम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here