woman gave birth to 5 babies in rajasthan: लग्नानंतर सात वर्षांनी महिला गर्भवती राहिली. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. घरात बाळाची पावलं पडणार म्हणून कुटुंब उत्साहात होतं. त्यातच महिलेनं एकाचवेळी पाच बाळांना जन्म दिला. कुटुंबाचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र त्यांचा आनंद फार दिवस टिकला नाही.

 

five babies
महिलेनं एकाचवेळी ५ बालकांना दिला जन्म
करौली: लग्नानंतर सात वर्षांनी महिला गर्भवती राहिली. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. घरात बाळाची पावलं पडणार म्हणून कुटुंब उत्साहात होतं. त्यातच महिलेनं एकाचवेळी पाच बाळांना जन्म दिला. कुटुंबाचा आनंद गगनात मावत नव्हता. कुटुंबातील सगळ्यांनाच आभाळ ठेंगणं झालं. मात्र त्यांचा आनंद फार दिवस टिकला नाही. डॉक्टरांनी बाळांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आलं. दुर्दैवानं पाचही बालकं दगावली. त्यात तीन मुलं आणि दोन मुली होत्या.

राजस्थानातील करौलीमधील मासलपूर पंचायत समितीच्या पिपरानी गावातील रेशमाचा विवाह सात वर्षांपूर्वी झाला. लग्नानंतर सात वर्षांनी रेशमा गर्भवती राहिली. करौलीतील एका खासगी रुग्णालयात २२ जुलैला महिलेनं एकाचवेळी ५ बाळांना जन्म दिला. सातव्या महिन्यात महिलेची प्रसुती झाली. त्यामुळे सर्व बालकं कमजोर होती. त्यांना इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं.
तरुणाच्या पोटात दुखू लागले; एक्सरे पाहून डॉक्टर चक्रावले, तब्बल ६३ नाणी आढळली
नवजात अर्भकांचं वजन ३०० ते ६६० ग्रॅमच्या दरम्यान होतं. या बालकांना इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं. त्यांना जयपूरला हलवण्याची तयारी सुरू होती, अशी माहिती डॉ. महेंद्र मीणा यांनी दिली. २५ वर्षांच्या रेशमानं २२ जुलैला ५ बाळांना जन्म दिला. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ केली. मात्र त्यात आम्हाला अपयश आलं, असं मीणा यांना सांगितलं.
विद्यार्थ्यांना रांगेत उभं केलं, सटासट थोबडवून शिव्या घातल्या; मेडिकल कॉलेजमध्ये अघोरी रॅगिंग
लग्नानंतर सात वर्षे रेशमाला मूलबाळ नव्हतं. मूल व्हावं यासाठी रेशमा यांनी बरेच प्रयत्न केले. अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले. सात वर्षांनी रेशमा गर्भवती राहिल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. एकाचवेळी पाच बालकं जन्माला आल्यानं सगळेच आनंदात होते. मात्र पाचही बालकांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here