मुंबई: कलाकारांच्या सिनेमातील व्यक्तिरेखेची, लूक्सची आणि विशेषत: त्यांच्या फॅशनची नेहमी चर्चा होते. सिनेमाचं प्रमोशन असो, पार्टी असो अथवा लग्नसोहळा असो या सगळ्यात कलाकारांच्या पेहरावाकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. पण दुसरीकडे दाक्षिणात्य कलाकारांसाठी ड्रेसिंग सेंन्स अगदी सामान्य गोष्ट असल्याचं दिसतं. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य कलाकार धनुष त्याच्या ‘द ग्रे मॅन’ या हॉलिवूडपटाच्या प्रिमियरसाठी पारंपरिक पेहरावात उपस्थित होता. त्यामुळे धनुषचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडासुद्धा आपल्या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अगदी साध्या पेहरावात दिसला. टीशर्ट-ट्रॅक पँट आणि अगदी स्लिपर अशा पेहरावत तो दिसला होता. ‘लायगर’च्या प्रमोशनवेळी तो अशा साध्या ड्रेसमध्ये पोहोचला होता. अगदी रणवीर सिंगने देखील ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे दाक्षिणात्य कलाकारांसाठी फॅशन आणि ड्रेसिंग सेन्स तितका महत्त्वाचा नाही अशीच चर्चा होतेय.

इतकच नव्हे तर प्रभास, ज्युनिअर एनटीआर, राम चरणसारखे दाक्षिणात्य कलाकारही त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे फॅशन आणि स्टाइलपेक्षा त्यांची अभिनय क्षेत्रातील प्रसिद्धीच त्यांना कायम ट्रेंडिंगमध्ये ठेवत असते, असं म्हणायला हरकत नाही.

हे वाचा-

कमाईचं गुपित
दाक्षिणात्य सिनेमांच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. दाक्षिणात्य सिनेमे यशस्वी होण्यामागची कारणं ही स्थानिक आणि इतर भाषांमध्येही सिनेमांचं प्रदर्शन, कलाकारांचं अप्रतिम अभिनय कौशल्य, उत्तम दिग्दर्शन आहेत. तरीही दाक्षिणात्य कलाकारांचा स्वभाव आणि पेहरावातला साधेपणा त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधत आपलंसं करतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एकूण फायदा बॉक्स ऑफिसवर होताना दिसतोय, असं तज्ज्ञांचं मत आहे.

हे वाचा-

फॅशन ट्रेंड महत्त्वाचा
बॉलिवूडच्या तारे-तारकांना फॅशन आणि ड्रेसिंग सेन्सवर विशेष लक्ष द्यावं लागतं. सुंदर आणि स्टायलिश दिसून लक्ष वेधण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते, त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन काहीतरी आणि हट के पेहराव करणं त्यांना गरजेचं वाटू लागलंय. आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा कलाकारांना चाहत्यांच्या रोषाला, ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. त्यामुळे नवीन काहीतरी आणि लक्षवेधी, पण चाहत्यांच्या पसंतीस उतरेल असा पेहराव करणं हे आव्हानच कलाकारांसमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here