NCP protest at Raj Bhavan | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे शनिवारी राज्यभरात पडसाद उमटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. भाजपच्या नेत्यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याविषयी असहमती दर्शविली होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले होते.

हायलाइट्स:
- आम्ही शांततेत आंदोलन करणार होतो
- पोलिसांनी आम्हाला इथेच ताब्यात घेतले
- हा आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे
यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासकट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थेट उचलून गाडीत टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आंदोलन पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात गुंडाळलं गेलं. या प्रकाराविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही शांततेत आंदोलन करणार होतो, पण पोलिसांनी आम्हाला इथेच ताब्यात घेतले. ही पोलिसांची जबरदस्ती आहे. हा आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांना महाराष्ट्रबद्दल प्रेम नाही. ते मराठी माणसाला भिकारी म्हणतात. हा आमच्या अस्मितेला लागलेला धक्का आहे. राज्यपाल महाराष्ट्रातील जनतेमध्ये दुही निर्माण करण्याचे काम करत आहेत, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे शनिवारी राज्यभरात पडसाद उमटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. भाजपच्या नेत्यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याविषयी असहमती दर्शविली होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.