दिवा: पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालयानं शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. काल सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घरावर छापा टाकला. जवळपास ९ तास त्यांची चौकशी झाली. मग त्यांना ताब्यात घेण्यात आलं. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. राऊत यांच्या अटकेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे काही महिन्यांपूर्वीचे दोन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

१२ मार्च २०२२ रोजी राज ठाकरे दिवा शहरात पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना सेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली होती. ‘आमचं राजकारण मिमिक्रीवर चालत नाही’, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर ‘आता त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी,’ असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं होतं. तर १२ एप्रिल २०२२ रोजी एका जाहीर सभेत टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, ‘आज पवारसाहेब संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही.
संजय राऊतांना अटक, शिवसेनेचा ‘आवाज’ आता कोण मांडणार? मातोश्रीवर फैसला
संजय राऊत यांच्या अटकेनंतर राज यांच्या दोन्ही विधानांची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना आज राऊतांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी काय सांगायचंय ते सांगितलंय, असं मोघम उत्तर पवार यांनी दिलं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ईडीने (ED) संजय राऊत यांच्या मालमत्तांवर छापे टाकून त्या जप्त केल्या होत्या. तेव्हा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याची आठवण पवारांनी आज करून दिली. मात्र त्यापलीकडे पवार काहीच बोलले नाहीत. त्यामुळे राज यांनी पवार आणि राऊत यांच्याबद्दल केलेलं भाकित खरं ठरणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here