Sanjay Raut news | संजय राऊत यांनी शिवसेना फोडण्याचे काम केले. संजय राऊत हे शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीसोबत आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राऊत यांनी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसला पूरक अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील कोणताही नेता त्यांच्या पाठिशी उभा राहणार नाही. ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेच्या एकाही नेत्याने छातीठोकपणे मी संजय राऊतांच्या पाठिशी आहे, असे म्हटले आहे का?

हायलाइट्स:
- शरद पवार सोमवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले
- प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना संजय राऊतांवरील कारवाईविषयी आणखी काही प्रश्न विचारले
- संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांची अवघ्या पाच शब्दांत प्रतिक्रिया
यावेळी संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली. संजय राऊत हा शरद पवार यांचा एक प्यादा होता. या प्यादाचं काम आता संपलं आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने ही गोष्ट ओळखली आहे. त्यामुळे आता शरद पवार यावर प्रतिक्रिया देणार नाहीत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. संजय राऊत यांनी शिवसेना फोडण्याचे काम केले. संजय राऊत हे शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीसोबत आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राऊत यांनी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसला पूरक अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील कोणताही नेता त्यांच्या पाठिशी उभा राहणार नाही. ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेच्या एकाही नेत्याने छातीठोकपणे मी संजय राऊतांच्या पाठिशी आहे, असे म्हटले आहे का?, असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.
शरद पवार हे स्वत:चा पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी शरद पवार यांनी ही खेळी केली होती. शिवसेना पक्ष फोडण्यात ते यशस्वी ठरले. शिवसेना फुटल्यानंतर शरद पवार यांना सगळ्यात जास्त आनंद झाला असेल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network