CWG 2022 Day 4 India Live Updates:राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताची नजर आणखी दोन सुवर्ण पदकांवर असेल. पुरुषांच्या ८१ किलो गटात अजय सिंह आणि महिलांच्या ७१ किलो गटात हरजिंदर कौर यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा आहेत बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल आणि मोहम्मद हुसामुद्दीन यांचा देखील आज लढत आहे. या शिवाय लॉन बॉलमध्ये महिलांची सेमीफायनल मॅच आहे.

पुरुष हॉकी संघ आज ग्रुप बीमध्ये इंग्लंडविरुद्ध मॅच खेळणार आहे. या शिवाय ज्युडो, स्विमिंग, स्क्वॉश, सायकलिंग, टेबल टेनिस आणि जिमनॅस्टिक्स मध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. चौथ्या दिवशी स्पर्धेत कोणत्या स्पर्धेत भारत कधी आणि केव्हा दावेदारी सादर करेल याचे सर्व अपडेट आणि निकाल महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या.

CWG 2022 Day 4 Live Updates

वेटलिफ्टिंग: पुरुषांच्या ८१ किलो गटात अजय सिंह- फेरी सुरू

आज राष्ट्रकुल स्पर्धेत भारत
>> वेटलिफ्टिंग- पुरुषांच्या ८१ किलो गटात अजय सिंह आणि महिलांच्या ७१ किलो गटात हरजिंदर कौर, दुपारी २ वाजता
>> टेबल टेनिस- पुरुष संघ सेमीफायनल- नायझेरियाविरुद्ध दुपारी २ वाजता
>> स्क्वॉश- पुरुष आणि महिला, दुपारी ४.३० पासून
>> बॅडमिंटन- मिश्र महिला सेमीफायनल, दुपारी ३.३० वाजता
>> ज्युडो- पुरुष आणि महिलांच्या लढती, दुपारी ३.३० वाजता
>> बॉक्सिंग- पुरुष अमित पंघाल, मोहम्मद हुसामुद्दीन, संध्याकाळी ४.४५ वाजता
>> हॉक- पुरुष संघ, भारताची लढत इंग्लंडविरुद्ध रात्री ८.३० वाजता

पदकतालिका-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here