जे. पी. नड्डांनी त्यांच्या भाषणात स्पष्टपणे शिवसेना अस्ताला जाईल, असं म्हटल्याचं पत्रकारांनी केसरकर यांना सांगितलं. त्यावर केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा संदर्भ दिला. ज्या शिवसेनेनं भाजपला फसवलं, त्या शिवसेनेबद्दल कदाचित नड्डा बोलत असतील. निवडणूक एकत्र लढवल. पण त्यानंतर वेगळ्या वाटेनं गेलेल्या, शब्द न पाळणाऱ्या शिवसेनेबद्दल नड्डा यांना काही बोलायचं असेल, तर मग मला काही म्हणायचं नाही, अशा शब्दांत केसरकर यांनी नड्डांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले नड्डा?
आजघडीला भाजपशी लढणारा कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई ही घराणेशाहीविरोधात आहे. भाजप हा एका विचारधारेवर लढणारा पक्ष आहे. हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो, हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. भाजपसमोर सर्वजण नष्ट झाले आहेत. जे झाले नाहीत तेदेखील संपतील. केवळ भाजप हा एकमेव पक्ष उरेल, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.
deepak kesarkar, फक्त भाजप राहणार! नड्डा थेट बोलले; शिंदे गटाची तारांबळ उडाली; केसरकरांनी कशीबशी बाजू सावरली – rebel shiv sena mla deepak kesarkar reaction on bjp president j p nadda
पाटणा: आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील. जे उरतील तेदेखील संपून जातील, असं प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी केलं. प्रादेशिक पक्ष संपतील आणि केवळ भाजप उरेल, असं नड्डा यांनी म्हटलं. नड्डा यांच्या विधानामुळे भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटाची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळालं.