ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना संजय राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय. ८ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय?, असा सवाल उपस्थित केला. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी राऊतांना सुनावली आहे.

हायलाइट्स:
- संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,
- सामनाची लेखणी आणि शिवसेनेचा ‘आवाज’ जेरबंद!
राऊतांना जेलमध्ये कोणत्या गोष्टींची मुभा?
- राऊतांना घरचं जेवण आणि औषध देण्याची मुभा
- सकाळी साडे आठ ते साडे नऊ राऊत वकिलांना भेटू शकतात
- रात्री साडे दहा नंतर राऊतांची चौकशी करु नये
राऊतांच्या वकिलांचा युक्तिवाद
- संजय राऊतांना सूडबुद्धीने अटक केली आहे
- ईडीला कोठडी हवी असेल तर कमी दिवसांची देता येईल
- रोख रकमेचा व्यवहार जुना आहे, मग आता तपास कसा काय
- संजय राऊतांना हृदयविकाराचा त्रास, रात्री चौकशी नको
वकील आणि पत्रकारांची कोर्टाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे मुश्किल झाले होते. पोलिसांच्या अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या कोर्ट नंबर १६च्या बाहेर वारंवार धक्काबुक्की झाली. यात महिला पत्रकार व महिला वकिलांचेही प्रचंड हाल झाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network