Sanjay Raut ED Custody: कुठलीही यंत्रणा कारवाई करताना त्यांच्याकडे पुरावे असतात. त्या पुराव्यांच्या आधारेच कारवाई केली जाते. आता ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे. आता न्यायालयात पुढे काय ते ठरेल. मला यापेक्षा जास्त बोलायचे नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. संजय राऊत यांना काल रात्री अटक झाल्यानंतर ते रात्रभर ईडीच्या कार्यालयात होते.

 

Sanjay Raut Devendra Fadnavis
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले
  • संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने रविवारी मध्यरात्री अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर आज सकाळपासून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ईडीच्या कारवाईचे समर्थन केले.

मला असं वाटतं की, कुठलीही यंत्रणा कारवाई करताना त्यांच्याकडे पुरावे असतात. त्या पुराव्यांच्या आधारेच कारवाई केली जाते. आता ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे. आता न्यायालयात पुढे काय ते ठरेल. मला यापेक्षा जास्त बोलायचे नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. संजय राऊत यांना काल रात्री अटक झाल्यानंतर ते रात्रभर ईडीच्या कार्यालयात होते. त्यानंतर आज सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
संजयचा मला अभिमान, तो झुकला नाही, निर्भीड आहे, राऊतांच्या लढाऊ बाण्याचं उद्धव ठाकरेंकडून कौतुक
राज्यकर्त्यांनी सूडबुद्धीने कारवाई करता कामा नये: अजित पवार

संजय राऊत यांच्यावरी अटकेच्या कारवाईबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, कोणत्याही राज्यकर्त्यांनी सूडबुद्धीने कारवाई करता कामा नये. कारण दिवस बदलत असतात, इतर गोष्टी घडत असतात. गेले बरेच दिवस इतक्या सगळ्या चर्चा सुरु होत्या. अनेकांना नोटिशी आल्या, काहींना चौकशीसाठी समक्ष बोलवण्यात आले. तपास यंत्रणांना चौकशीचा पूर्ण अधिकार आहे. पण कुठल्याही नागरिकाच्या बाबतीत चौकशी होताना सूडबुद्धीने कारवाई करता कामा नये, असे अजित पवार यांनी म्हटले.
हे दिवस फिरतील तेव्हा तुमचं काय होईल याचा विचार करा, उद्धव ठाकरेंचा भाजपला गर्भित इशारा

संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया

महाविकास आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने अटक केली होती. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, मी काय सांगायचंय ते सांगितलंय. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ईडीने (ED) संजय राऊत यांच्या मालमत्तांवर छापे टाकून त्या जप्त केल्या होत्या. तेव्हा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याच अनुषंगाने शरद पवार यांनी आता, मी काय सांगायचंय ते सांगितलंय, असे वक्तव्य केल्याचा अंदाज आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here