जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अपघात विभागात सय्यद मुस्तफा हा स्वीपर म्हणून काम करतो. नेहमीप्रमाणेच मुस्तफा हा साफसफाई करत होता. यावेळी साफसफाई कचरा शेख सुलैमान उर्फ बादल सिडीकी शेख याच्या अंगावर उडाला. त्याने सय्यद मुस्ताक पाला शिवीगाळ केली. शिवीगाळ करु नका असे म्हणाल्यानंतर शेख सुलेमान याने सय्यद मुस्ताक याच्यावर कटरने वार केला. वार चुकविण्याच्या प्रयत्नात सय्यद मुस्ताक यांनी प्रयत्न केला असता तो वार त्याच्या पाठीवर बसल्याने पाठीवर जखम झाली.
यावेळी गजानन जावळे हे आरोपीला धरण्यासाठी गेले असता त्याने त्यांच्यावर देखील कटरने वार केले. यामध्ये जावळे देखील जखमी झाले. आरडाओरड केल्याने सेवेवर असलेले पोलिस कर्मचारी संजय देवकते पळत आले.त्यांनी आरोपीला पकडून पोलिस स्टेशन येथे नेले.
उपचार घेतल्यानंतर गजानन जावळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. जावळे यांच्या तक्रारीवरून शेख सुलेमान उर्फ बादल शेख सिद्दीकी याच्यावर शासकीय कामात अडथळा करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्या प्रकरणी नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.