नवी दिल्ली : पृथ्वी २४ तासांमध्ये एक परिक्रमा पूर्ण करते आणि तोच आपल्याकडे एक दिवस होतो. मात्र, आता पृथ्वीच्या अक्षावर फिरण्याचा वेग वाढतोय का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण, १९ जुलै रोजी, सर्वात लहान दिवस म्हणून पृथ्वीने विक्रम मोडला. यादिवशी मानक २४ तासांपेक्षा १.५९ मिलीसेकंद कमी वेळेत आपली कक्षा पूर्ण केली.

‘द इंडिपेंडंट’च्या रिपोर्टनुसार, पृथ्वीचा वेग अलिकडे वाढत चालला आहे. २०२० हा, पृथ्वीचा १९६० नंतरचा सर्वात लहान महिना ठरला. यावर्षी १९ जुलै हा सर्वात लहान दिवस मोजला गेला. सामान्य १४ तासांच्या दिवसापेक्षा हा १.४७ मिलिसेकंद कमी होता.

१४ कोटींची संपत्ती ९ तास चौकशी! राऊतांना ताब्यात घेतलेल्या भांडूपमधील बंगल्याची किंमत किती?
यानंतर २०२१ मध्येदेखील ग्रहाचा फिरण्याचा वेग हा वाढत होता. पण यावेळी कोणत्याही विक्रमाची नोंद करण्यात आली नाही. दरम्यान, ‘इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग (IE)’ नुसार, या लहान दिवसांच्या ५० वर्षांच्या टप्प्याची सुरुवात असू शकते.

दरम्यान, पृथ्वीच्या अशा वेगवेगळ्या फिरण्याच्या गतीबद्दल शास्त्रज्ञांनी अद्याप कोणतीही ठोस माहिती दिली नाही. तर त्यांचा असा अंदाज आहे की हे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये अंतर्गत किंवा बाह्य पृष्ठभागावरील प्रक्रिया, महासागर, भरती-ओहोटी किंवा हवामानातील बदलांमुळे असू शकते.

फेसबूकवरून प्रेम नंतर धोका; ३ वेळा विकलं, अनेकदा बलात्कार; पीडितेने सांगितला थरार
‘इंडिपेंडंट’च्या अहवालानुसार, जर पृथ्वी वाढत्या वेगाने फिरत राहिली तर निगेटिव्ह लीप सेकंदांचा वापर महत्त्वाचा ठरेल. हे एकप्रकारे काही सेकंदांना काढून टाकण्यासारखे आहे किंवा अणु घड्याळाची वेळ बदलणे आहे जेणेकरून सूर्याभोवती पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग सुसंगत ठेवला जाईल.

निगेटिव्ह लीप सेकंद जोडल्याने काही तोटे देखील होतील. उदाहरणार्थ, सौर वेळेनुसार सेट केलेल्या स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि कम्युनिकेशन सिस्टमवर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. बर्‍याच शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे मोठं नुकसान होईल.

सौदी अरेबियात ८ हजार वर्ष जुन्या शहराचा शोध; खोदकाम सुरू असताना सापडले प्राचीन मंदिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here