मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांना काही महिन्यांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर सलमाननं मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. यावेळी त्यानं बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर शस्त्र परवाना दिला जावा अशी मागणी केली होती. सलमानची ही मागणी मुंबई पोलिसांनी मान्य केली आहे.

राजीव गांधींच्या हत्येतील दोषीबरोबर ‘बाहुबली’ फेम अभिनेत्याचा डान्स

बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमानने त्याची आणि कुटुंबाची सुरक्षा वाढवली. तो स्वतःदेखील बुलेटप्रूफ गाडीतून फिरत आहे. धमकी मिळाल्यानंतर सलमाननं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची मुख्यालयात जाऊन भेट घेतली होती. यावेळी सलमाननं स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची विनंती अर्ज केला होता. पोलिसांनी त्याची ही विनंती मान्य केली आहे.

सलमान खान

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई यानं घेतली. याच लॉरेन्स बिश्नोईनं सलमानलादेखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. लॉरेन्सनं पोलीस चौकशीत त्यानं सलमानला दिलेल्या धमकीची कबुली दिली आहे.

मोदींनी केलेल्या विधानावर अभिनेत्याने विचारला प्रश्न, झाला ट्रोल

इतकंच नाही तर दोन वर्षांपूर्वी सलमानच्या घराची पाहणी करत त्याच्या हत्येचा कटही रचला होता. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी सलमान आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. त्यात ‘तुझी अवस्थादेखील सिद्धू मूसेवालासारखी करू’ असं नमूद केलं होतं. या धमकीनंतर सलमाननं मुंबई पोलिसांकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची विनंती केली होती.

अशोक सराफांसोबतची पहिली भेट विसरूच शकत नाही- रवी जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here