who is swapna patkar: शिवसेनेच्या टीकाकारांना सातत्यानं अंगावर घेणारे, महाविकास आघाडीसाठी ढाल बनलेले खासदार संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. पत्रा चाळ घोटाळ्यात सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात मनी लॉण्ड्रिंगचे आरोप झाले आहेत. या प्रकरणात आणखी एक नाव समोर आलं आहे. स्वप्ना पाटकर.

स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची भेट २००७ मध्ये झाली. त्यावेळी राऊत वर्तमानपत्रात कार्यकारी संपादक होते. राऊत यांच्याशी ओळख कशी झाली आणि पुढे काय घडलं, याची माहिती पाटकर यांनी पोलिसांना दिली आहे. २००७ मध्ये पाटकर आणि राऊत यांची पहिली भेट झाली. हळूहळू कौटुंबिक संबंध वाढत गेले, असं पाटकर यांनी पोलिसांना सांगितलं.
मी व्यवसायिक भागिदार व्हावी, अशी राऊत यांची इच्छा होती. मात्र त्यासाठी मी स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे संजय राऊत खूप नाराज झाले. २० नोव्हेंबर २०१६ मध्ये राऊत यांना भेटण्यासाठी मी त्यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांनी माझा हात पकडला. ते जोरजोरात माझ्यावर ओरडू लागले. पोलीस कारवाईची धमकी देऊ लागले, असं पाटकर यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.