Eknath Shinde told pilot stop plane | नाशिकच्या मालेगाव येथे सोमवारी झालेल्या सभेतही एकनाथ शिंदे यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकनाथ शिंदे हे यावेळी श्रोत्यांना आपल्या कामाची पद्धत कशी झटपट आहे, हे सांगत होते. मी मुख्यमंत्री झालो तरी माझ्यातला कार्यकर्ता कधीच मरणार नाही. फाईल्सवर सही करा, आदेश द्या, हे सगळं मला जमत नाही. आपण डायरेक्ट फोन उचलून काम करण्याचे आदेश देतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

 

Eknat Shinde 11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • एक फोन, विषय क्लिअर
  • एकनाथ शिंदेंचा लीलावती रुग्णालयात फोन
  • पायलटनं विमान ५ मिनिटं थांबवलं
नाशिक: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ते सातत्याने चर्चेत आहेत. महाविकास आघाडी सरकारचे निर्णय रद्द करण्याचा धडाका असू दे किंवा एका फोनवर कोणतेही काम मार्गी लावण्यासाठी आदेश देतानाचे व्हिडिओ असोत, येन केन कारणेन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या प्रकाशझोतात आहेत. नाशिकच्या मालेगाव येथे सोमवारी झालेल्या सभेतही एकनाथ शिंदे यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकनाथ शिंदे हे यावेळी श्रोत्यांना आपल्या कामाची पद्धत कशी झटपट आहे, हे सांगत होते. मी मुख्यमंत्री झालो तरी माझ्यातला कार्यकर्ता कधीच मरणार नाही. फाईल्सवर सही करा, आदेश द्या, हे सगळं मला जमत नाही. आपण डायरेक्ट फोन उचलून काम करण्याचे आदेश देतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

आपली ही कार्यपद्धती समजावून सांगण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मालेगावमधील या सभेत एक किस्सा सांगितला. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात एकनाथ शिंदे यांच्या ओळखीतील व्यक्तीवर उपचार सुरु होते. त्यावेळी संबंधित व्यक्तीचे तपासणीचे रिपोर्ट मिळण्यास काही कारणाने उशीर होत असावा. त्याबद्दल सांगताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अरे माणूस गेल्यावर फोन करून काय उपयोग? माणूस जिवंत करण्यासाठी फोन केला पाहिजे ना. त्यावेळी मी विमानात बसलो होतो. लीलावती रुग्णालयात असलेल्या अधिकाऱ्याला फोन लागत नव्हता, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ठाकरे सरकारचे निर्णय रद्द करणे घटनाबाह्य; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान
अधिकाऱ्याचा फोन बिझी येत असल्याने मी विमानाच्या वैमानिकाला सांगितलं की, पाच मिनिटं थांब मला एक महत्त्वाचा फोन लावायचा आहे. त्यानंतर मी फोन लावला. विमानाचा पायलट १० मिनिटं थांबून होता. मी फोन केला, चर्चा झाली आणि दादाचा रिपोर्ट लगेच आला. माझा फोन वेळेवर गेला नसता तर काय उपयोग होता? सरकार हे लोकांना न्याय देण्यासाठी पाहिजे. लोक सरकारसाठी नसावेत, तर सरकार लोकांसाठी असले पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मात्र, हा किस्सा सांगताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचं विमान हे हवेत होतं की जमिनीवर याचा नेमका खुलासा केला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण एकनाथ शिंदे यांची फिरकी घेताना दिसत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here