Kalyan railway station | लीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दोघांची चौकशी केली असता ख्वाजा शेख हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात पुढे आले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी यापूर्वी असे प्रकार केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान भरदिवसा असे प्रकार घडत असल्याने पोलिसांची भिती आता उरलेली नाही का ,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हायलाइट्स:
- कल्याण स्टेशनच्या परिसरातील धक्कादायक घटना
- दोनशे रुपये दिले नाही म्हणून महिलेवर केले वार
हा वाद विकोपाला गेल्यानंतर महिलेने मोबाईलवरून आपल्या नातेवाईकाला फोन लावला. त्यावेळी महिलेने फोनवरून या दोन्ही तरुणांची तक्रार आपल्या नातेवाईकाकडे केली. या प्रकारामुळे हे दोन्ही तरुण संतापले. राग आल्यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही तरुणांनी त्यांच्याजवळील धारदार ब्लेडने महिलेवर सपासप वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.हा सर्व प्रकार भर दिवसा सोमवारी सकाळी भर वस्तीत घडला.अचानक घडलेल्या या प्रकाराने महिला पूर्णपणे गांगरली होती.
सुदैवाने यावेळी रस्त्यावरून जात असणाऱ्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर दोन्ही मारेकरी पळून गेले. याप्रकरणाची महिलेकडून तक्रार होताच, पोलिसांनी रेल्वे स्थानक भागातील घटना घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रिकरण तपासून मारेकऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली. रहिम शेख, ख्वाजा शेख अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दोघांची चौकशी केली असता ख्वाजा शेख हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात पुढे आले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी यापूर्वी असे प्रकार केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान भरदिवसा असे प्रकार घडत असल्याने पोलिसांची भिती आता उरलेली नाही का ,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network