मागील वर्षी गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नामांतर नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आल्याने पंतप्रधान मोदी टीकेचे लक्ष्य ठरले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या बाबतही असाच काहीसा प्रकार होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंडखोरी केल्यानंतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांची साथ त्यांना लाभत आहेत. माजी नगरसेवक असलेल्या प्रमोद भानगिरे यांनीही शिंदे गटात सामील होणं पसंत केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी भानगिरे यांच्यावर पुणे शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या जबाबदारीनंतर त्यांच्यावरील निष्ठा दाखवण्यासाठीच भानगिरे यांनी उद्यानाला शिंदे यांचे नाव दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
दरम्यान, जागा जरी महापालिकेचे असली तरी हे उद्यान मी स्वखर्चाने विकसित केले आहे. तसंच आसपासच्या सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव उद्यानाला देण्यास सहमती दर्शवली होती, असं म्हणत माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलं होतं.
एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर असून शहर आणि जिल्ह्यात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणी; तसेच विकासकामे आढावा बैठक होईल. त्यानंतर पत्रकार परिषदही होईल. दुपारी दीड वाजता फुरसुंगी येथील पाणी योजनेची पाहणी मुख्यमंत्री शिंदे करतील. दुपारी अडीच वाजता शिंदे जेजुरी येथील खंडोबा देवस्थानाला भेट देतील. पावणेतीन वाजता ते सासवड येथे जाहीर सभा घेतील. सायंकाळी सहा वाजता हडपसर, हांडेवाडी येथे दोन प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. सायंकाळी आठ वाजता सातारा रस्त्यावर शंकर महाराज मठ, त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व दत्त मंदिराला ते भेट देतील. या ठिकाणी गणेशोत्सव व नवरात्र मंडळांची बैठकही होईल.