मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी तब्बल अर्धा तास लटकत राहिली. यादरम्यान तिच्या कुटुंबीयांनी आणि शेजारच्या फ्लॅटमधील लोकांनी तिला पकडून ठेवलं होतं. अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलीला सुखरूप खाली उतरवलं. या संपूर्ण थरार सुरू असेपर्यंत परिसरात एकच खळबळ उडाली होती.
ही घटना मुंबईच्या नालासोपारा परिसरात घडली आहे. रजिया खान असं मुलीचं नाव असून तिला गॅलरीत उभी असताना चक्कर येत होती. नालासोपारा (पश्चिम) येथील रिलायबल अपार्टमेंटमधील तिच्या फ्लॅटच्या बालकनीत ती उभी होती. चक्कर आल्याने ग्रील नसलेल्या बालकनीतून ती खाली पडली. पण पडताना तिने चौथ्या मजल्यावर असलेल्या ग्रीलला पकडलं.
मुलीला वाचवण्यासाठी धावले शेजारी…
रझियाने कसं तरी चौथ्या मजल्यावरची बालकनी पकडली. आरडाओरडा केल्याने कुटुंबीय व आजूबाजूचे लोक जमा झाले. दुसऱ्या इमारतीतील लोकही आले आणि मुलीला वाचवू लागले. चौथ्या मजल्यावरील लोकांनी मुलीचा हात धरला होता. त्यांनी तात्काळ वसई विरार महानगरपालिकेच्या (VVMC) अग्निशमन दलाशी संपर्क साधला.
बालकनीमध्ये ग्रिल लावण्याचे आदेश…
श्रीपेज अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाच्या चार जवानांनी इमारतीत पोहोचून मुलीला सुखरूप खाली उतरवले. इमारतीतील लोकांनी मुलगी पडू नये म्हणून तिला दोरीने बांधल्याचे साक्षीदारांनी सांगितले. मुलीने सांगितले की तिला उंचीची भीती वाटते. अशात अचानक तिला चक्कर आल्याने ती खाली पडली. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी बालकनीत ग्रील लावण्याचे आदेश दिले आहेत.