Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra | आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तीपात झाला आहे. आमची सगळी शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे. एकही शिवसैनिक त्यांच्या पाठिशी राहिलेला नाही. आदित्य ठाकरे हे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

 

Aaditya Thackeray Tanjai Sawant (1)
आदित्य ठाकरे आणि तानाजी सावंत

हायलाइट्स:

  • आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं
  • आदित्य ठाकरेंचा शक्तीपात झाला आहे
  • आदित्य ठाकरे हे कोण आहेत?
मुंबई:आदित्य ठाकरे हे केवळ एक आमदार आहेत. त्यापलीकडे मी त्यांना फार महत्त्व देत नाही, असे वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी केले आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज पुण्यातील कात्रज चौकात सभा घेणार आहेत. हे ठिकाणी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर आहे. त्याचवेळी आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेही कार्यक्रम आहेत. मुख्यमंत्री आज पुण्यात आढावा बैठकीसाठी येणार आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची सभा असून ते तानाजी सावंत यांनाही भेटणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची सभा नेमका हाच मुहूर्त साधून कात्रज चौकात ठेवण्यात आली का, असा प्रश्न तानाजी सावंत यांना विचारण्यात आला. आदित्य ठाकरे मुद्दाम तुमच्याविरोधात शक्तीप्रदर्शन करत आहेत का, असे सावंत यांना विचारण्यात आले. त्यावर तानाजी सावंत यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर देताना म्हटले की, आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तीपात झाला आहे. आमची सगळी शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे. एकही शिवसैनिक त्यांच्या पाठिशी राहिलेला नाही. आदित्य ठाकरे हे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे.
‘गद्दारांचे सरकार कोसळणारच’; पावसात कार्यकर्त्यांच्या गर्दीतून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसैनिकांनी पुण्यातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. मात्र, माझे कार्यालय शिवसैनिकांनी नव्हे तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भगवे शेले घालून माझ्या कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत एक किंवा दोनच शिवसैनिक असतील, असेही तानाजी सावंत यांनी सांगितले.
‘दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ’; कोकणातून आदित्य ठाकरेंनी उडवली शिंदे-फडणवीसांची खिल्ली

पुण्यातील उद्यानाला एकनाथ शिंदेंचं नाव दिल्याने वाद

महापालिकेच्या जागेत उभारण्यात आलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव देण्याचा प्रताप हडपसर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने केला होता. या उद्यानाचं उद्घाटन स्वत: एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच होणार होते. मात्र सर्वच स्तरातून झालेल्या टीकेनंतर हा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

उद्यानांना कुटुंबातील व्यक्तींची किंवा वैयक्तिक नावे देता येणार नाहीत, असा ठराव महापालिकेकडून करण्यात आलेला असतानाही माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव उद्यानाला दिल्याने शहरातील नागरिकांनी याला विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर सदर उद्यानाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते होणार नसल्याचा खुलासा भानगिरे यांनी काहीवेळापूर्वीच केला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here