Ashok Chavan may resign from congress | विधानसभेत नुकत्याच झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे काही नेते उशीरा पोहोचल्याने गैरहजर राहिले होते. त्यामुळे बहुमत प्रस्तावावेळी विरोधकांचे संख्याबळ कमी झाले होते.विशेष म्हणजे त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाठिशी असणाऱ्या अदृश्य हातांचे आभार मानले होते. इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी अशोक चव्हाण सभागृहात उशीरा आल्याने काँग्रेसच्या वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते.

 

Ashok Chavan 11 (1)

हायलाइट्स:

  • नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली होती
  • काँग्रेसमध्ये अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा
नाशिक: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षाला अलविदा करणार असल्याची चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीच नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. ही चर्चा कोण करत आहे, हे माहिती नाही. असल्या चर्चांना मी महत्त्व देत नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अशोक चव्हाण काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. विधान परिषदेत पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्याविरोधात झालेले क्रॉस व्होटिंग, विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावादरम्यान जवळपास ११ आमदारांची अनुपस्थिती आणि औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला न झालेला विरोध लक्षात घेता काँग्रेसमध्ये अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यात अशोक चव्हाण यांचेही नाव होते. त्यातच नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिल्याने ही शक्यता आणखीच बळावली होती.
आदित्य ठाकरे केवळ एक साधा आमदार, त्यापेक्षा जास्त काही नाही: तानाजी सावंत
विधानसभेत नुकत्याच झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे काही नेते उशीरा पोहोचल्याने गैरहजर राहिले होते. त्यामुळे बहुमत प्रस्तावावेळी विरोधकांचे संख्याबळ कमी झाले होते.विशेष म्हणजे त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाठिशी असणाऱ्या अदृश्य हातांचे आभार मानले होते. इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी अशोक चव्हाण सभागृहात उशीरा आल्याने काँग्रेसच्या वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या प्रकाराची गंभीर दखल घेत अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यानंतर अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
लायकी नसलेल्यांच्या हाती देश उभारणीचे काम; अभिनेता सुबोध भावेची जोरदार टीका

हे माझे पहिलेच बाळंतपण नाही: अशोक चव्हाण

जे काम मंजूर झाले त्याला स्थगिती, ज्याची वर्कऑर्डर झाली नाही त्याला स्थगिती अशाप्रकारे स्थगिती देण्याचा सपाटा सुरू आहे. सरकार येते अन् जाते. मीही मंत्री, मुख्यमंत्री होतो. नंतर राजीनामा दिला. त्यामुळे माझे हे काही पहिले बाळंतपण नाही, अशी मिश्कील टिप्पणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. सरकार कुणाचेही असो, परंतु जनतेची कामे थांबली नाही पाहिजेत, असेही ते म्हणाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here