पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर येत असून शहरात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता विधान भवन इथे पाऊस, अतिवृष्टी, पीक, पाणी व विकास कामे याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

विधान भवनाबाहेर पोलिसांना मोठा फौज फाटा आहे. या बैठकीला ज्या लोक्रतिनिधींना निमंत्रण आहे. अशाच लोकांना आतमध्ये सोडण्यात येत आहे. विधान भवनाबाहेर पोलिसांच्यावतीने येणाऱ्या प्रत्येक जणाची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, या बैठकीत निलम गोऱ्हे हजर राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

मुंबईत थरार! चक्कर आली अन् पाचव्या मजल्यावरून पडली, अर्धा तास चौथ्या मजल्यावर झुलत राहिली अन्…
विधानभवन येथे होणाऱ्या बैठकीला खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांनाच आतमध्ये सोडण्यात येत आहे. आजच्या या बैठकीत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी हजर राहणार आहे. आजच्या या बैठकीत विधान परिषद आमदार उपसभापती नीलम गोरे बैठकीला उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर दुसरीकडे पुण्याचे माजी पालकमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. पुणे जिल्ह्याची आढावा बैठक आणि अजित पवार हे गेल्या कित्येक वर्षापासून समीकरण आहे. भाजपची सत्ता असताना गिरीश बापट पालक मंत्री होते. त्यावेळी देखील अजित दादांचा दरारा पुण्यातील विधानभवनामध्ये पाहायला मिळत असे. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर अजित दादा हे गैरहजर राहणार आहेत. अजित पवार हे सध्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे, या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशी माहिती आहे.

पृथ्वी फिरत नाहीय धावतेय; २४ तासातला वेग पाहून शास्त्रज्ञांची झोप उडाली, पाहा आता काय होणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here