श्रेयानं गोवा ट्रीपचे फोटो शेअर केल्यानंतर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर निवांत क्षण असोत किंवा तिथले हटके कॅफे श्रेया खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत आहे. तसंच तिनं खास गोव्यातील फिश थाळीचा फोटोही शेअर केला आहे. त्यात तळलेला मासा, माश्याचं कालवण ,भात, सोलकढी अशा विविध पदार्थांनी भरलेल्या ताटाचा फोटोही तिनं शेअर केला आहे. भरलेल्या ताटाचा हा फोटो पाहून कोणत्याही खाद्यप्रेमींनी कमेंट्स केल्यात. पण अनेकांनी तिला टोलाही लगावला आहे. श्रावण वैगेरे पाळत नाही का? असा खोचक प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला आहे.
श्रेयानें शेअर केलेला फोटो पाहून अभिनेता स्वप्निल जोशी यानंही कमेट्स केल्या आहेत. स्वप्निलनं लिहिलं आहे की, ‘तू गोव्यात असेपर्यंत मी तुला ब्लॉक करत आहे. जेवणाचे हे फोटो आता मी अजून पाहू शकत नाही…’ स्वप्निलनं केलेल्या या कमेंट्सनंतर श्रेयानं त्याला चिडवण्यासाठी आणखी एक लज्जतदार थाळीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने इन्स्टास्टोरीला शेअर केला आहे. तसंच स्वप्निलला उत्तर देताना तिनं म्हटलं आहे की, ‘नका ना असं करू…’ दरम्यान, स्वप्निल शिवाय सोनाली खरे, अभिज्ञा भावे, सुयश टिळक यांनी देखील मजेशीर अशा कॉमेन्ट केल्या आहेत.