या शिक्षकाला घरात जाण्यापासून विरोध झाला. मात्र, तरीही त्या घरात गेल्या आणि हा सर्व प्रकार समोर आला. यावेळी शिक्षक जाधव यांनी मुख्याध्यापक शिक्षकेला घराबाहेर ढकले. पती शिक्षक अंकुश तर्फे याने मुख्याध्यापक पत्नीला मारहाण केली तर ऋषिकेश साळुंखे आणि सुदर्शन पवार यांनीदेखील या शिक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी केस तालुक्यातील वडगाव या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Teacher Husband was Caught in an Unwanted Situation with Fellow Teacher
बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शिक्षक पतीस त्याच्या सहकारी शिक्षकेसोबत नको त्या अवस्थेत शिक्षक पत्नीने पकडल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकाची पत्नी मुख्याध्यापिका असून हा प्रकार युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या घटनेत शिक्षक पतीसह आणि पाच जणांनी मुख्याध्यापक शिक्षिकेस काठीने मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या पाचही जणांवर युसूफ वडगाव या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.