Eknath Shinde | मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. या पाच जणांवर एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन मुंबई’ची जबाबदारी दिली आहे.

 

Eknath Shinde Uddhav Thakceray
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न
  • मुंबईतील शिवसेनेचे किती नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागणार
  • शिवसेनेचे ४० ते ४५ नगरसेवक फुटतील
मुंबई: राज्यभरात शिवसेनेला हादरा दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाने मुंबईतही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांना गळाला लावण्याची तयारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून खास रणनीती आखण्यात आली असून मुंबईतील (BMC Election 2022) प्रत्येक बंडखोर आमदारावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे टप्याटप्प्याने शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्यात आले त्याच पद्धतीने आता मुंबईतील शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकांसाठी शिंदे गटाकडून सापळा रचण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मुंबईतील शिवसेनेचे किती नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (BMC Election 2022)
Shivsena: शिंदे गटाच्या आमदारांनी कार्यालयातून ठाकरे पितापुत्रांच्या तसबिरी हटवल्या, आदित्य ठाकरे म्हणाले…
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. या पाच जणांवर एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन मुंबई’ची जबाबदारी दिली आहे. तर अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविलेल्या खासदार राहुल शेवाळे यांच्या माध्यमातूनही शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील. राज्यात झालेले सत्तांतर आणि विरोधकांवर तपास यंत्रणांची असलेली वक्रदृष्टी यामुळे मुंबईतील शिवसेनेचे ४० ते ४५ नगरसेवक फुटतील, असा अंदाज आहे.
फोन लावण्यासाठी पायलटला विमान ५ मिनिटं थांबवायला सांगितलं, एकनाथ शिंदेंचा किस्सा व्हायरल

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंनाही धक्का

उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ शिंदे गटाने राज ठाकरे यांच्या मनसेलाही मोठा धक्का दिला आहे. पनवेल, उरण, खारघरमधील अनेक मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मनसेला मोठे खिंडार पडले आहे. माजी जिल्हाध्यक्षांसह ६५ जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सोमवारी रात्री मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्यासह आजी माजी पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. अलीकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईसह रायगडचा दौरा केला होता. परंतु, त्यानंतर काही दिवसांतच या भागात मनसेचा मोठे खिंडार पडले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here