mallika sherawat casting couch, बॉलिवूडची काळी बाजू, हिरो रात्री तीन वाजताही…अभिनेत्रीचा गौप्यस्फोट – mallika sherawat share the dark side of bollywood suffering casting couch, says “if the hero calls you at 3am
मुंबई: एखाद्या कलाकाराची विशिष्ट इमेज झाली, की तशाच भूमिका त्याला साकाराव्या लागतात. बॉलिवूड नायिकेला हॉट करण्यात मल्लिका शेरावतचं योगदान कुणीही नाकारणार नाही. अर्थात तिला त्यामुळं तोटेही झाले आणि अखेर निर्माता दिग्दर्शकांच्या अवास्तव मागण्यांमुळ चित्रपटांना रामराम ठोकावा लागला. स्वतः मल्लिकानं त्याचा किस्सा शेअर केला होता. आता मल्लिकानं आणखी एक धक्कादायक किस्सा शेअर केलाय.
मल्लिकानं सांगितला ‘तो’ किस्सा मी इतरांच्या तालावर नाचू शकत नाही, त्यांच्या इच्छेनुसार वागले नाही. कास्टिंग काऊचबद्दल बोलताना मल्लिका म्हणाली की, तुम्ही जर एखाद्या चित्रपटामध्ये काम करत असाल आणि त्यातल्या हिरोनं तुम्हाला रात्री तीन वाजता कॉल करून घरी बोलवलं तरी तुम्हाला जावं लागतं, तुम्ही नाही गेलात तर, तो प्रोजेक्ट हातातून गेलाच म्हणून समजा’.
दिया मिर्झाच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा मृत्यू आणखी एक किस्सा सांगताना मल्लिका म्हणाली की, ‘निर्माता-दिग्दर्शकांच्या मागण्या अवास्तव असतात. मी एक गाणं करत होते. त्यात मी किती हॉट आहे हे दाखवण्यासाठी निर्मात्याला भन्नाट कल्पना सुचली. माझ्या पोटावर ऑम्लेट केलेलं दाखवावं असा निरोप त्यानं नृत्यदिग्दर्शकाकरवी पाठवला. तो ऐकून मी उडलेच. विशिष्ट इमेजमुळं अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं. पुढं मी अशाच कारणास्तव चित्रपटांमधून बाजूला झाले. मी चित्रपटात आले तेव्हा मला कशा भूमिका द्याव्यात हे अनेकांना कशत नव्हतं. मी चुंबनदृश्य द्यायला तयार होते. स्वतःच्या शरीराबद्दल मला न्यूनगंड नसल्याने मी बोल्ड भूमिका करायला तयार होते. त्यातून माझी इमेज तयार होत गेली. मी जे काम केलं, त्याची खंत वाटत नाही.’