मुंबई : पहिल्या इलेक्ट्रिक वातानूकुलीत डबल डेकर बेस्ट बसमधून गारेगार प्रवास करण्याची मुंबईकर प्रवाशांची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आता येत्या शुक्रवारी वातानूकुलीत डबल डेकर बस धावणार आहे. याबरोबरच मुंबईत आता एकूण ९०० इलेक्ट्रिक बस धावताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे डबल डेकर बसला दोन जिने असणार आहेत आणि लंडनमधील डबल डेकर बससारखाच या बसचा लूक असणार आहे. (first ac double decker bus to run in mumbai from friday)

येत्या शुक्रवारी मुंबईच्या रस्त्यांवर ९०० इलेक्ट्रॉनिक बस धावणार असून पहिल्या खेपेतील या बसेस मुंबईतील काही मार्गावर सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर या वर्षाअखेर आणखी २२५ इलेक्ट्रिक बस बेस्टच्या नव्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तर आणखी २२५ बस पुढील वर्षी मार्च महिन्यात दाखल होत आहेत. तसेच, जून २०२३ मध्ये या ताफ्यात आणखी ४५० बसेसची भर पडणार आहे.

एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवकही फोडणार, प्रत्येक आमदाराला दिलं टार्गेट?
किती असेल भाडे?

किमान अंतरासाठी (म्हणजेच ५ किलोमीटर) या बससाठी प्रवाशांना ६ रुपये मोजावे लागणार आहेत.

कुठून कुठे धावणार ?

सुरुवातीला या नव्या बसेस पुढील तीन मार्गांवरून धावणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मार्गांमध्ये वाढ केली जाणारआहे.

> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट
> कुलाबा ते वरळी
> कुर्ला ते सांताक्रुझ

पत्रा चाळीमुळे संजय राऊत अडकले, तुरुंगात गेले; आता रहिवाशी म्हणतात, आमचं ठरलंय!
नव्या बसेसची वैशिष्ट्ये-

> प्रत्येक नव्या बसला असतीन दोन जिने. जुन्या बसला केवळ एकच जिना होता.
> नव्या बसमध्ये उत्तम सस्पेन्शन असेल.
> तसेच बसमध्ये डिजिटल टिकेटिंगची सोय असेल
> प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असेल.

मुंबईत थरार! चक्कर आली अन् पाचव्या मजल्यावरून पडली, अर्धा तास चौथ्या मजल्यावर झुलत राहिली अन्…
मुंबईत धावत आहेत ४५ जुन्या डबल डेकर बस

मुंबईत सध्या जुन्या एकूण ४५ डबल डेकर बसेस धावत आहेत. या बसेस टप्प्याटप्प्याने बाद करण्यात येणार आहेत. सन १९४७ मध्ये डबल डेकर बेससच्या ताफ्यात एकूण २४२ बसेस होत्या. त्यानंतर पुढे सन १९४७ ते १९९३ या कालावधीत या ताफ्यात आणखी ८८२ बसेस दाखल झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here