Authored by महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Aug 2, 2022, 5:15 PM

EPFO Orphan Pension: जर पालकांपैकी एक किंवा दोघेही नोकरी करत असतील आणि कर्मचारी पेन्शन योजनेचे सदस्य असतील तर त्यांच्या मुलांना आर्थिक मदत मिळू शकते. कंपनीने केलेल्या योगदानाचा काही भाग ईपीएसमध्ये जमा केला जातो.

 

EPF Orphan Pension Scheme.

हायलाइट्स:

  • कर्मचारी पेन्शन योजनेसाठी कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकही पैसा कापत नाही.
  • योजनेअंतर्गत कंपनीच्या योगदानाचा काही भाग ईपीएसमध्ये जमा केला जातो.
  • नवीन नियमानुसार १५,००० रुपयांपर्यंत मूळ वेतन असणाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे.
नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या साथीमुळे मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, तर अनेक मुलेही अनाथ झाली. कुटुंबातील सर्व सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि मुले अनाथ झाली, अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अशा त्या मुलांना कर्मचारी पेन्शन योजना (जीपीएस) अंतर्गत आर्थिक मदत मिळू शकते. मात्र, हा लाभ त्या अनाथ मुलांना उपलब्ध असेल, ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक नोकरी करत होते आणि जीपीएस सदस्य होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ईपीएस योजनेअंतर्गत अनाथ मुलांना मिळणाऱ्या फायद्यांविषयी सांगितले आहे.

ईपीएस अंतर्गत कोणते फायदे?

  • अनाथ मुलांना विधवा निवृत्ती वेतनाच्या ७५ टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल.
  • ही रक्कम दरमहा किमान ७५० रुपये असेल.
  • दोन्ही मुलांपैकी प्रत्येकाला दरमहा ७५० रुपये पेन्शन मिळेल.
  • या योजनेंतर्गत अनाथ मुलांना वयाच्या २५ वर्षापर्यंत पेन्शन दिली जाईल.
  • मुलांना काही अपंगत्व आले असेल तर त्यांना आयुष्यभर पेन्शन दिली जाईल.

वाचा – शेतकऱ्यांसाठी खास किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या या कार्डचे नेमके फायदे, अर्ज कसा करायचा?

काही योगदान द्यायचे का?

  • ईपीएससाठी कंपनी कर्मचार्‍यांच्या पगारातून एकही पैसा कापत नाही.
  • कंपनीच्या योगदानाचा काही भाग ईपीएसमध्ये जमा केला जातो.
  • नवीन नियमानुसार १५,००० रुपयांपर्यंत मूळ वेतन असणाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे.
  • पगाराच्या ८.३३ टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा केली जाते.
  • मूळ वेतन १५,००० रुपये असताना कंपनी ईपीएसमध्ये १,२५० रुपये जमा करते.

वाचा – पेन्शन धारकांना दिलासा देणारी बातमी; EPFO ने सुरू केली नवीन सुविधा

कोणता पुरावा द्यावा लागेल
पेन्शनधारकांना कर्मचारी पेन्शन योजना-११९५ (ईपीएस-९५) अंतर्गत पेन्शन पेमेंटसाठी जीवन प्रमाणपत्र किंवा डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. दरवर्षी निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पेन्शन मिळण्यास कोणताही अडथळा येत नाही.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here