नेमकं प्रकरण काय?
३० ते ३२ वर्षाची एक तरुणी लोअर परळ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करते. हॉटेलची मेंबरशीप घेण्यासाठी केदार दिघे यांचा मित्र रोहित कपूर त्या हॉटेलमध्ये गेला. सदस्य फी चा चेक घेण्यासाठी हॉटेलच्या खोलीत गेल्यावर रोहितने बलात्कार केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार न करण्यासाठी दिघेंकडून धमक्या येत होत्या असे या तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.
केदार दिघे यांची बाजू याप्रकरणी अद्याप समोर आलेली नाही. केदार दिघे त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत काय भूमिका मांडणार हे पाहावं लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार महिला खाजगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर असून त्या लोअर परेल, मुंबई भागातील एका हॉटेलमध्ये येणाऱ्या गेस्टना अटेन्ड करणं क्लब मॅरेट मेम्बरशीपबाबत माहिती देण्याचे काम करतात. २८ जुलै रोजी तक्रारदार महिलेस आरोपी रोहित कपूर याने क्लब मेरेट मेम्बरशीप घेतो असे सांगून तिला एका जेवणासाठी बोलावून जेवण झाल्यानंतर मेम्बरशीपचे पैसे देण्याच्या बहाण्याने तो थांबलेल्या रुममध्ये येण्यास भाग पाडले. सदर महिला त्या रुममध्ये गेली असता तिच्यावर आरोपी रोहित कपूर याने लैगिंक अत्याचार केला. सदर महिलेने घाबरुन या घटनेवाची कोठेही वाच्यता केली नाही.
३१ जुलै रोजी नमुद महिलेने सदरची घटना तिच्या मित्रांना सांगितले व आरोपी रोहित कपूर यास व्हॉट्सअपद्वारे मॅसेज करून याबाबत जाब विचारला असता त्याने तिचे व्हॉट्सअप ब्लॉक केले. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी तक्रारदार महिलेने तिच्या मित्रांच्या मार्फतीने आरोपीस विचारणा केली असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही व आरोपी रोहित कपूर याने त्याचा मित्र केदार दिघे याचे मध्यस्थीने पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करणेबाबत सांगितले. त्याला तक्रारदार महिलेने नकार दिला असता केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या जबाबावरुन ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे आरोपी रोहित कपूर व केदार दिघे यांच्या विरुद्ध कलम ३७६, ५०६ (२) भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास चालू आहे.