Child Marriage Nandurbar : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षात सर्वाधिक दहा हजार मुलींचा बाल विवाह (Child Marriage) झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यापैकी 2 हजार 305 मुलींना अठरा वर्षाच्या आत मातृत्व आले आहे. जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याचे समोर आले आहे .सामाजिक रुढी परंपरांच्या नावाखाली अधिकारी आता आपली जबाबदारी झटकत असल्याचे समोर आलं आहे. राज्य सरकारनं बाल विवाह रोखण्यासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित केल्या असतानाही हे वास्तव नंदूरबार जिल्ह्यातून समोर आलं आहे.

52 हजार 773 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आलं

नंदूरबार जिल्ह्यात तब्बल दहा हजार मुलींचा बालविवाह झाल्याचे समोर आले आहे. यातील जवळपास 2 हजार 305 मुली या अठरा वर्षाच्या आत गर्भवती होऊन आई झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. मंगळवारी नंदूरबार जिल्हा परिषदेच्या झालेल्या सर्वसाधरण सभेत महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा अधिकृत आकडा जाहीर केला आहे. कुपोषणावरुन जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात मोठी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच कुपोषणासाठी बालविवाह हे मोठे कारण ठरत असल्याचे सांगत विभागाच्या वतीने हे आकडे जारी करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यातील 52 हजार 773 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातील 9 हजार 983 मुलींचा म्हणजे 18.96 टक्के मुलींचा बालविवाह झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली गेली आहे. विशेष म्हणजे बाल विवाह रोखण्याची जबाबदारी ज्या महिला बालकल्याण विभाग आणि जिल्हा परिषदेची असते, मात्र त्यात हलगर्जीपणा असल्याचे म्हटले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, दुसरीकडं राज्य सरकारनं बाल विवाह रोखण्यासाठी विविध जबाबदारी निश्चिती केल्या होत्या. त्यात गावात होणाऱ्या बाल विवाहासाठी सरपंच पोलीस पाटील यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बाल विवाह झाले असल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. तर प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कारभारावर या कारणावरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. इतक्या प्रमाणात बाल विवाह होत असतील तर महिला बालकल्याण आणि ग्रामपंचायत विभाग यांनी ही माहिती वेळीच का पुढे आणली नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here