husband commits suicide body found hanging on tree: हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील बाबळी गावात एका व्यक्तीच्या पत्नीचा नागपंचमीच्या दिवशी मृत्यू झाला होता. पत्नीच्या विरहामुळे सदर व्यक्तीने पत्नीच्या आठवणीत २ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्याच दिवशी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

विशेष म्हणजे संजय शिंदे यांनी ज्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली, त्या झाडाखाली आपल्या पत्नीसह असलेला फोटो ठेवून त्यावर लग्नाची तारीख व पत्नीच्या मृत्यूची तारीख लिहून ठेवल्यानंतर याच चिठ्ठीत पत्नीच्या आठवणींबद्दल एक काव्य लिहून ठेवले होते. परंतु संजय यांचे मोठे बंधू प्रभाकर दादाराव शिंदे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत असं म्हटलं आहे की, त्यांची हयात असलेली दुसरी पत्नी अलका संजय शिंदे यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून माझ्या भावाने आत्महत्या केली आहे.
प्रभाकर यांच्या फिर्यादीवरून अलका यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. संजय यांच्या पश्चात दोन मुलं व एक मुलगी असा परिवार आहे. ते शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.