मुंबई: स्वत:च्या पत्नीचे न्यूड फोटो तिच्या फोन नंबरसह सोशल मीडिया साईट्सवर शेअर करणाऱ्या पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा पती बिहारमधील पाटण्याचा असून पवई पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

डेटा लॅब फर्ममध्ये कार्यरत असलेल्या पवईतील २८ वर्षीय महिलेला ५ जुलैला एक फोन कॉल आला. तुमचं शरीर खूप सुंदर आहे, तुमच्या पोटावरचा टॅटू चांगला आहे, असं फोन करणारी व्यक्ती म्हणत होती. एका ऍपवरून तुमचा फोन नंबर मिळाला असं अज्ञात व्यक्तीनं महिलेला सांगितलं. ‘माझ्या पत्नीला पाहण्यात, माझ्या हॉट बायकोशी बोलण्यात रस आहे का? मला मेसेज करा आणि तिच्याशी बोलण्याची संधी मिळवा,’ अशा आशयाचा मजकूर ऍपवर पाहून कॉल केल्याचं संबंधित व्यक्ती म्हणाली.
अखेरची नागपंचमी, १७ वर्षांची साथ आणि…; पत्नीसोबतचा फोटो झाडाखाली ठेवून पतीचा गळफास
यानंतर महिलेनं पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिला आणि तिचा पती वेगळे राहतात. पती पाटण्यात वास्तव्याला असतो. महिलेनं गेल्या वर्षी पतीविरोधात छळाची तक्रार नोंदवली होती. ती मागे घेण्यासाठी पती दबाव टाकत असल्याचं महिलेनं सांगितलं. तक्रार मागे न घेतल्यास परिणामांना सामोरी जा, अशी धमकी पतीनं दिल्याचं महिलेनं तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. महिलेचे न्यूड फोटो कुठून अपलोड करण्यात आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. आयपी ऍड्रेस शोधून काढण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here